पहिल्या मोहिमेवर निघालो, तेव्हा मानवी क्रौर्याची आणि अगतिकतेची एवढी परिसीमा अनुभवाला येईल, असं मात्र वाटलं नव्हतं!
सत्ता, मग ती आर्थिक वा धार्मिक असो वा साधनसंपत्तीच्या अधिकारासाठी असो, कोणाच्या हाती असावी यावर त्या सामान्य जनतेचं काही मत असतं असंही नाही. या नाड्या कोणाच्या हाती असाव्यात, याबाबत त्याचा काहीही आग्रह नसतो. पण दुर्दैवाने याच लोकांची युद्धात सर्वाधिक होरपळ होताना मी बघितली आणि अनेकदा मन उदास झालं. .......